Vehicle Theft : चाकण आणि पिंपरीमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण येथे महिंद्रा कंपनीच्या  गेटसमोरील पार्किंग मधून तर उद्यमनगर पिंपरी येथील एका घरासमोरून अशा दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रामचंद्र रघुनाथ कदम (वय 32, रा. देहुगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डीलक्स दुचाकी (एम एच 11 / ए ई 8721) मंगळवारी (दि. 15) दुपारी तीन वाजता महिंद्रा कंपनीच्या गेट बाहेरील पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अकरा वाजता फिर्यादी काम संपवून घरी जाण्यासाठी निघाले असता पार्किंग मधून त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

अजय बाबासाहेब देशमुख (वय 54, रा. उद्यमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 22 हजार रुपये किमतीची हिरो पॅशन एक्सप्रो दुचाकी (एम एच 14 / डी वाय 6250) दोन जून रोजी सायंकाळी त्यांच्या घराच्या समोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार तीन जून रोजी उघडकीस आला आहे. याबाबत 13 दिवसानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.