Chakan Crime News : मुलीचे फोटो व्हायरल केल्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांना हॉकीस्टिकने मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मुलीचे फोटो का व्हायरल केले, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 21) महाळुंगे गावात घडली.

वैभव अरुण गायकवाड (वय 20), अजय अरुण गायकवाड (वय 22, दोघे रा. म्हाळुंगे, ता. खेड) अशी यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 43 वर्षीय व्यक्तीने शनिवारी (दि. 23) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीचे फोटो व्हायरल केले. त्याबाबत ‘माझ्या मुलीचे फोटो का व्हायरल केले’ असा फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्यावर आरोपीने ‘हो मी केले फोटो व्हायरल. ती मला आवडते. तुम्हाला काय करायचे ते करा. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुझ्या भावांना का बरोबर आणले नाही. तुम्हा तिघा भावांना जीवे मारून टाकीन’ असे म्हणत हॉकीस्टिकने हातावर, पाठीवर, पायावर मारहाण केली. एका आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारून फिर्यादी यांना धमकी दिली. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.