Maval News : हॉटेलच्या स्टाफरूममध्ये झोपलेल्या आठ कामगारांना दांडक्याने मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये काम करणा-या आठ कामगारांना स्टाफ रूममध्ये जाऊन दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. कामगार झोपलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री नऊ वाजता कुसगाव येथील एम्ररिस हॉटेलमध्ये घडली.

प्रज्वल शांताराम कदम, रंजित विजय केदारी (दोघे रा. कुसगाव, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मिलिंद रमेश कांबळे (वय 32, रा. भोसरी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुसगाव येथील एम्ररिस हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. आरोपींनी विनाकारण हॉटेलच्या स्टाफरूम समोर येऊन लाकडी दांडक्याने स्टाफ रूमचा दरवाजा तोडला. हॉटेलच्या स्टाफला मारहाण करण्यास सुरुवात केली.

फिर्यादी घाबरून विजय आडसूळ यांच्याकडे गेले आणि या प्रकाराबद्दल त्यांना सांगितले. फिर्यादी आणि विजय आडसूळ स्टाफ रूमकडे आले असता आरोपी स्टाफरूम मध्ये झोपलेल्या आठ कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत होते. फिर्यादी आणि विजय आडसूळ आल्याचे पाहून आरोपी पळून गेले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलीस नाईक जुदरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.