Chakan Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे कामगाराची चौकशी आणि निलंबन; प्लांट हेड, एचआर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीचा प्लांट हेड आणि एचआर यांनी मिळून कंपनीतील एका कामगाराच्या विरोधात चौकशी लावली तसेच कामगाराला निलंबित केले. या प्रकरणी प्लांट हेड आणि एचआर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 ऑक्टोबर 2020 ते 28 जानेवारी 2019 या कालावधीत अॅमकोर कंपनीत घडला.

सिद्धार्थ देविदास गेठे (वय 31, रा. शिरोली, ता. खेड) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एच आर मंगेश रमेश पोतदार, प्लांट हेड मनीष ठाकुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी हे शिरोली येथील बिलकेअर कंपनीत काम करत असल्याबाबतची एप्रिल, मे, नोव्हेंबर 2020 या कालावधीतील निकिज युटिलिटी सर्विसेस यांचे अटेंडन्स कार्ड, पे स्लीप, पेमेंट वाऊचर तसेच निकिज युटिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे श्री कदम यांनी दिलेले पत्र अशी बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे खरे असल्याचे भासवून त्या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी फिर्यादी यांची कंपनीत चौकशी केली तसेच या प्रकरणी फिर्यादी यांचे निलंबन केले.

दरम्यान, फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.