Pune Crime News : वडीलांच्‍या अस्थी विसर्जन करण्यासाठी कार घेऊन गेला तो परत आलाच नाही..

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अनोखा प्रकार उघडकीस आलाय. वडिलांच्या आस्थि विसर्जन करण्यासाठी जात असल्याचे सांगून एक व्यक्ती कार घेऊन गेली. त्यानंतर चार महिने झाले तरी ती परत आलीच नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सागर रामचंद्र इसवे यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अंबर अनिब चटर्जी आणि मामीन शेख या दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सागर आणि आरोपी अंबर एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चार महिन्यापूर्वी आरोपीने वडिलांच्या अस्थि विसर्जित करण्यासाठी नाशिकला जायचे आहे असे सांगून फिर्यादीची कार नेली. त्यानंतर चार महिन्यापासून त्याने कार परत केलीच नाही.

फिर्यादीने आरोपीकडे अनेकदा गाडी परत मिळावी यासाठी मागणी केली. परंतु प्रत्येक वेळी आरोपीने गाडी परत देण्यास टाळाटाळ केली. परंतु चार महिन्यानंतरही गाडी परत देत नसल्याचे पाहून फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.