Wakad Crime News : भागीदारीत हॉटेल सुरू करण्याच्या बहाण्याने पावणे सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – भागीदारीत हॉटेल सुरु करण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यक्तीची पावणे सात लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर 2019 ते 19 जून 2020 या कालावधीत पुनावळे येथे घडला.

राहुल हरसोट, केतन हरसोट (दोघे रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमित सूर्यकांत नौबदे (वय 31, रा. पुनावळे) यांनी गुरुवारी (दि. 28 ऑक्टोबर) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला नवीन डायनिंग हॉल टाकायचे आहे. त्यात तुम्हालाही पार्टनर घेतो आणि त्यासाठी मला काही पैशांची गरज आहे. तू त्यामध्ये गुंतवणूक कर असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून पावणे सात लाख रुपये घेतले. मात्र आरोपींनी हॉटेल सुरु न करता तसेच त्यांचे पैसे परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.