Talegaon Crime News : नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत चावसर वस्तीजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.17) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

विश्वास शिवाजी कदम (वय 35) व समीर अशोक शेटे (वय 23) (दोघेही रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन बबनराव काचोळे यांनी तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत चावसर वस्तीजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्यासाठी दोन बैल पिकअपमध्ये (एम एच 14 एच जी 1257) घालून आणले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी, तळेगाव एम आय डी सी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.