Talegaon Crime News : फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दहा जणांची 63 लाख 55 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दोघांनी मिळून 10 जणांची 63 लाख 55 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2015 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वतननगर, तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.

गोपाळ लक्ष्मण कोंडावार (रा. रामदास पे, नागपूर), अनिस चांद शेख (रा. पुसद, जि. यवतमाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समीर तुकाराम उबाळे (वय 46, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरिक्षक साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बांधकाम व्यावसायिक असून नागरिकांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करावी अशी त्यांनी स्कीम सुरु केली होती. आमच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास प्रोजेक्टच्या एकूण नफ्यातील पाच टक्के लाभांश देऊ. अन्यथा प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करा, तो फ्लॅट बाजारभावापेक्षा कमी पैशांमध्ये देऊ, असे आरोपी लोकांना अमिश दाखवले.

फिर्यादी आणि अन्य 10 लोकांनी आरोपींच्या प्रोजेक्टमध्ये लाखो रुपये गुंतवले. मात्र आरोपींनी नागरिकांना कोणताही मोबदला न देता तब्बल 63 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. आरोपी गोपाळ याला नागपूर पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.