Chakan Crime News : अंगावर पाणी उडवल्याचा जाब विचारल्याने तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – अंगावर पाणी उडाल्याचा जाब विचारल्याने तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 11) रात्री पावणे आठ वाजता खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडली.

सचिन काळुराम दौंडकर (वय 32, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वास दशरथ इंगळे, राजेश काळुराम इंगळे (दोघे रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून जाताना त्यांच्या दुचाकीने फिर्यादी यांचा मित्र सुरेश नामदेव निचित याच्या अंगावर पाणी उडाले. याबाबत फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी, फिर्यादी यांचा मावस भाऊ रावसाहेब दौंडकर, प्रशांत मोहिते यांना शवीगाळ, दमदाटी केली. राजेश इंगळे याने फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांना जखमी केले. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.