Hinjawadi Crime News : आलिशान कारमधून गुटखा वाहतूक; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – आलिशान कारमधून गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 26) दुपारी माणगाव येथे करण्यात आली.

गौरव महेश भिंगारे (वय 22, रा. कासारअंबोली, ता. मुळशी), शेखर गोळे (रा. पिरंगुट, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पांढ-या रंगाच्या स्कोडा कार मधून गुटखा विक्री करण्यासाठी नेत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्यावर कारवाई केली. पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि स्कोडा कार असा एकूण पाच लाख 86 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.