Bhosari Crime News : कर्ज देण्याच्या आमिषाने 70 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेला पैशांची गरज असल्याने दोघांनी मिळून महिलेला कारवर कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून 70 हजार रुपये घेतले. पैसे परत न करता तसेच कर्ज काढून न देता महिलेची फसवणूक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर आणि चक्रपाणी वसाहत येथे घडला.

दत्ता बना (बनकर) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 27) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने आरोपी फिर्यादी यांना म्हणाला की, ‘मी व्याजाने पैसे देतो. तुमची कार मला द्या. त्यावर तुम्हाला कर्ज काढून देतो. तुमच्या कारवर कर्ज काढायचे नसेल तर मी माझ्या मित्राच्या वॅगनर कारवर तुम्हाला कर्ज काढून देतो.

परंतु त्या कारचे कागदपत्र दुस-या व्यक्तीकडे गहाण आहेत. ते सोडविण्यासाठी 70 हजार रुपये द्या.’ फिर्यादी यांनी 70 हजार रुपये आरोपीला दिले. मात्र आरोपीने फिर्यादी यांना कर्ज काढून दिले नाही. तसेच त्यांचे पैसेही परत दिले नाहीत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.