Pune Crime News : धक्कादायक! पत्नीला व्हाट्सअॅपवर दिला ट्रिपल तलाक; पती, सासू विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीचा घरगुती कारणांवरून छळ करून तिला माहेरी पाठवले. त्यानंतर तिच्या व्हाट्सअपवर तीनवेळा तलाक असा मेसेज पाठवून विवाहितेशी काडीमोड घेतला. याप्रकरणी पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नानापेठ, पुणे येथे घडला.

पती साजिद मगदूम शेख, सासू जैबुनिसा मगदूम शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित विवाहितेकडे माहेरहून कुलर, इस्त्री, रॅक इत्यादी साहित्य आण्यासाठी तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेला मानसिक त्रास देत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली.

दरम्यान, मुलगी आजारी पडल्यानंतर मुलीला आणि विवाहितेला माहेरी सोडले व आजारपणाचा खर्च विवाहितेच्या माहेरच्या लोकांना करण्यास लावला. आरोपी पती साजिद याने पीडित विवाहितेच्या व्हाट्स अॅपवर ‘तेरेको तलाक दे देता मै, तलाक-तलाक-तलाक’ असा मेसेज पाठवून विवाहितेशी काडीमोड घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.