Dehuroad News : दोन भावांना सहा अल्पवयीन मुलांकडून विनाकारण मारहाण

एमपीसी न्यूज – दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन भावांना सहा अल्पवयीन मुलांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास मुकाई चौक कॉर्नर, किवळे येथे घडली.

अमोल संजय वाघमारे (वय 23, रा. किवळे), दिपक वाघमारे अशी जखमींची नावे आहेत. अमोल यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ शनिवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. ते किवळे येथील मुकाई चौक कॉर्नरवर आले असता सहा अल्पवयीन मुले दुचाकीवरून आली. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रस्त्यात अडवले. विनाकारण शिवीगाळ करून सहा पैकी एकाने फिर्यादी यांच्या कपाळावर, डोक्याच्या मागील बाजूला दगडाने मारून जखमी केले. तसेच त्यांचा भाऊ दिपक वाघमारे यांच्या डाव्या हातावर मारून जखमी केले.

पोलिसांनी सहा मुलांना समजपत्र देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.