Thergaon : डेंगू सदृश आजाराने महिनाभरात दोन भावांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – डेंगू सदृश आजाराने थेरगावातील एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा आज मृत्यू झाला. तर, महिनाभरापूर्वीच चिमुकल्या बालकाचा डेंगू सदृश आजारानेच मृत्यू झाला. महिना उलटण्याच्या आतच एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नागरिक हळहळ करत आहेत.

उजेर हमीद मणियार (वय 4, रा. पडवळनगर, थेरगाव) या बालकाचा आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजता मृत्यू झाला. तर, त्याचा नऊ महिन्याचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा 16 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. महिनाभरात दोनही मुले गमावल्याने मणियार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

उजेर याला उपचारासाठी पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होते. तेथून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचारादरम्यान उजेर या चिमुकल्याचा मृत्यू झाला. डेंगू सदृश आजाराने त्याचा मृत्यू झाला आहे. तर, महिनाभरापूर्वीच उजेर याच्या भावाचा मृत्यू झाला होता. महिनाभरात मणियार कुटुंबातील दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत बोलताना महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, उजेर मणियार याच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. माहिती मागविली आहे. डेंगूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील.

दरम्यान, थेरगाव परिसरात गेल्या आठ महिन्यापूर्वी जुने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून नवीन टाकण्यात आले आहेत. हे काम करताना जुने कनेक्शन मात्र तसेच ठेवले आहेत. त्यामुळे स्वच्छ पाण्याचे डबके साचून डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होत आहे. परिसरातील नागरिकांना डेंगूची लागण होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.