Nigdi crime News : निगडी परिसरात दोन घरफोड्या; सात मोबईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज – निगडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोड्या केल्या. त्यामध्ये एकूण सात मोबईल फोन चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

पहिल्या घटनेत शुभम हनुमंत गायकवाड (वय 23, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी गायकवाड यांच्या घराच्या गॅलरीच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातून 49 हजार 100 रुपये किमतीचे पाच मोबईल फोन आणि दोन बॅगा चोरून नेल्या. हा प्रकार रविवारी (दि. 13) पहाटे दोन ते चार वाजताच्या सुमारास घडला.

दुस-या घटनेत धम्मपाल भिवा तरकसे (वय 26, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरकसे यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 19 हजार रुपये किमतीचे दोन मोबईल फोन चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास घडली.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.