Pune News : दगड खाणीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती मधून एक दुःखद घटना समोर आली आहे. दगड खाणीमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सम्राट संतोष शिंदे (वय ८) आणि देवा तानाजी शिंदे ( वय ९) अशी या मुलांची नावे आहेत. बारामती परिसरातील पिंपळीमध्ये ही घटना घडली. 

_MPC_DIR_MPU_II

या दोन्ही मुलांचे आई-वडील मजुरीची कामे करतात. मंगळवारी ते काम करण्यासाठी गेले होते. ही दोन्ही मुले घरी एकटीच होती. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते घराजवळ असणाऱ्या दगड खाणी मध्ये साचलेल्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान संध्याकाळी दोघांचेही आई वडील घरी परत आल्याने त्यांनी या दोन्ही मुलांची शोधाशोध केली परंतु ते सापडले नाहीत. काही नागरिकांनी दगड खाणीतील पाण्यात शोध घेतला असता या दोघांचेही मृतदेह सापडले. या घटनेमुळे संपूर्ण बारामतीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.