Omircon Variant News :ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले २ रुग्ण

एमपीसी  न्यूज : कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्याने दक्षिण आफ्रिकेने 26 नोव्हेंबरला जगाला सावध केलेले. मात्र, त्या आधीच हा व्हेरिअंट अस्तित्वात असल्याने तो जगभरात पसरू लागला होता. त्यानंतर आता भारतात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचं सांगितलं असून आत्तापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचे  देखील त्यांनी यावेळी सांगितले . 

लव अग्रवाल म्हणाले, “जे लोक ‘जोखमी’ असलेल्या देशांतून येत आहेत, त्यांना विमानतळावर RTPCR टेस्ट करणे आवश्यक आहे. जर ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यावर क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल अंतर्गत उपचार केले जातील. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. याच बरोबर, सुमारे 29 देशांमध्ये ओमायक्रॉनची 373 प्रकरणे आढळून आली आहेत, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.