Pune District Crime News गाडी पार्क करण्याच्या वादातून पॅरोलवर सुटून आलेल्या गुन्हेगाराचा गोळीबार, दोघे गंभीर जखमी

एमपीसी न्युज : गाडी पार्क करण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीनंतर दोघांनी गोळीबार केला. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

ऋषभ रामदास  शेवाळे (वय २२, रा. शेवाळे वाडी उरुळी देवाची ता हवेली जि पुणे) आणि संकेत सदाशिव पाटील (वय २१, मूळ रा इरला ता जि उस्मानाबाद सध्या रा ससाणे नगर हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.  यातील आरोपी ऋषभ शेवाळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात चारून आदी गुन्हे दाखल आहेत. तीन महिन्यापूर्वी तो पॅरोलवर सुटून येरवडा कारागृहातून बाहेर आला आहे. याप्रकरणी सुनील गाडे (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गॅरेज आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते गाडी घेऊन घ्यायला आले असता त्याठिकाणी एक टेम्पो लावला होता. टेम्पो बाजूला काढण्यावरून हा वाद झाला. टेम्पो चालकाने भांडणानंतर सात ते आठ जणांना घेऊन आला आणि त्याने फिर्यादी त्यांचे भाऊ आणि इतर मित्रांना लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण करण्यासाठी आलेल्यापैकी एकाने फिर्यादी यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. ही गोळी त्यांचा भाऊ आणि आणखी एका मित्राला लागली. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.