India Corona Update : देशातील दोन कोटी रुग्ण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 83.50 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र असून बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा अधिक आहे. मागील 24 तासांत देशात 3 लाख 44 हजार 776 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णापैकी दोन कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, देशाचा रिकव्हरी रेट 83.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 43 हजार 144 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 40 लाख 46 हजार 809 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 79 हजार 599 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्या 37 लाख 04 हजार 893 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत चार हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 62 हजार 317 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.09 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 31 कोटी 13 लाख 24 हजार 100 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 75 हजार 515 चाचण्या गुरुवारी (दि.13) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 17 कोटी 92 लाख 98 हजार 584 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.