Sangavi News : झी कॅफे ‘डान्स विथ मी’ रिॲलिटी शोमध्ये पुण्यातील दोघांची निवड

एमपीसी न्यूज – झी कॅफेवरील ‘डान्स विथ मी’ या नृत्यावर आधारित रिॲलिटी शोमध्ये पुण्यातील दोन मुलांची निवड झाली आहे. साहिल डोळस (11) आणि दुर्वा भैक (10) अशी या दोघांची नावे आहेत. प्रसिद्ध बॉलीवूड डान्सर शक्ती आणि मुक्ती मोहन यांचा हा रिॲलिटी शो आहे.

साहिल आणि दुर्वा हे नवी सांगवी येथील जनरेशन नेक्स्ट डान्स अकॅडमी येथे नृत्याचा सराव करतात. नृत्यदिग्दर्शक पंकज सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल आणि दुर्वा यांची निवड ऑडिशन द्वारे करण्यात आली आहे. या शोसाठी संपूर्ण भारतातून फक्त पन्नास जणांची निवड झाली त्यात या दोघांचा समावेश आहे.

सह्याद्री वाहिनीवर येणा-या ‘दम दमा दम’ या कार्यक्रमात देखील साहिल आणि दुर्वा यांनी उत्तम नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.