Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे येथे दोन दिवसीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे विरंगुळा केंद्राच्या सहकार्यने व कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने दोन दिवसीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धा शनिवारी (दि.3) व रविवारी (दि.4) या दोन दिवसात विरंगुळा केंद्र येथे पार पडणार आहेत.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे तळेगाव दाभाडे शहराचे सी.ओ. विजय कुमार सरनाईक , तसेच पुणे कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष भारत देसडला व तळेगाव शहरातील उद्योजक संतोष खांडगे ,विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष जागिरदार व रोटरी क्लब चे अध्यक्ष व अशितोष धोडमिसे, नंदू सोनवणे, सुदाम दाभाडे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते आज पासून कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब कानवडे यांनी केले.

Hinjawadi : घरातून चोरीला गेलेल्या एटीएम कार्डद्वारे काढले पावणे दोन लाख

या स्पर्धेमध्ये एकूण 152 जणांनी सहभाग घेतला असून यात 120 पुरुष व 32 महिलांचा समावेश आहे. दोन दिवसांच्या स्पर्धानंतर उद्या (रविवारी) सायंकाळी साडे पाच वाजता विरुंगळा केंद्रावर बक्षिस वितरणाचा समारंभ असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.