BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलतर्फे दोन दिवसीय मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज –  द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 यांच्यातर्फे व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट), पोलिओ कॅलिपर्स, सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा वाटप शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय हे शिबिर शनिवार, 5 जानेवारी व रविवार, 6 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 :30  ते सायंकाळी 6:00 या वेळेत महावीर प्रतिष्ठान, महर्षीनगर पोलीस चौकीजवळ, सॅलिसबरी पार्क, पुणे येथे होणार आहे. हे शिबिर पूर्णतः मोफत आहे, अशी माहिती जयपूर फूटचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दीपक सेठिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लायन राजेंद्र गोयल, लायन श्याम खंडेलवाल, लायन वीरेंद्र पटेल, सुनील पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दीपक सेठिया म्हणाले, “लायन हसमुख मेहता यांनी जयपूर फूट शिबिराची सुरुवात केली. पुण्यात शनिवार व रविवार या दोन दिवशी होत असलेले हे 51 वे शिबिर आहे. आजवर जवळपास सात ते आठ हजार लोकांना जयपूर फूटचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर कॅलिपर्स, सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा शेकडोच्या संख्यने वाटण्यात आले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, नाशिक, कोपरगाव, संगमनेर या ठिकाणी हे शिबीर आयोजिले जाते. एका शिबिरात साधारणतः 600-700 लोकांना लाभ होतो”

वीरेंद्र पटेल म्हणाले, “पुण्यासह 3 व 4 जानेवारीला पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात हे शिबिर आयोजिले आहे. त्याचबरोबर फाटलेले किंवा विद्रुप असलेल्या ओठ, कान व नाक यावर मोफत शल्य चिकीत्सा शिबिर महावीर प्रतिष्ठान येथे त्याच दोन दिवशी होणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.