Pune : पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत उद्यापासून दोन दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन : अमित कुमार

Pune: Two-day lockdown in Pune cantonment from tomorrow: Amit Kumar

एमपीसी न्यूज : पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी दि. 9 आणि रविवारी दि. 10 असे सलग दोन दिवस कॅन्टोन्मेंट हद्दीत कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ अमित कुमार यांनी आज ( शुक्रवारी  दिली.

यासंदर्भात अमित कुमार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे निर्दशनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोर्ड कार्यालयात आज ( शुक्रवारी ) बैठक घेण्यात आली. या मध्ये झालेल्या चर्चेनंतर हद्दीत दोन दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार शनिवारी ( दि. ९) आणि रविवारी ( दि. १९) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या कालावधीत मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने आणि व्यवहार बंद राहणार असल्याचे सीईओ अमितकुमार यांनी म्हटले आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोना संक्रमणाचा आकडा वाढत आहे. प्रामुख्याने घोरपडी, फातिमा नगर, सोलापूर बाजार, दस्तूर मेहेर रोड आणि भीमपुरा या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही न्यू मोदीखाना भागात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे.

त्यामुळे कॅन्टोनमेंट हद्दीतील नागरिकांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करावे. उद्यापासून लागू होणाऱ्या कडकडीत लॉकडाउनच्या काळात सर्वानी घरात राहावे. कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन सीईओ अमितकुमार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.