H3N2 Influenza Virus : भारतात H3N2 विषाणूमुळे दोघांचा मृत्यू, ही आहेत लक्षणं

एमपीसी न्यूज :  कोरोनानंतर  देशात आता H3N2 व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा आणि कर्नाटकमध्ये (H3N2 Influenza Virus) प्रत्येकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

एका अहवालानुसार, कर्नाटकातील हसनमधील 82 वर्षीय व्यक्ती हा देशातील H3N2 ने मृत्यू पावणारा पहिला व्यक्ती आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेंट गौडा यांना 24 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 1 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता असे सांगण्यात येत आहे.

Lonavala News : लोणावळ्याजवळील वलवण गावातून दोन कासवांना दिले जीवनदान

देशात H3N2 व्हायरसची सुमारे 90 प्रकरणे नोंदली गेली आहेत. H1N1 विषाणूचेही आठ रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशात फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. (H3N2 Influenza Virus) बहुतेक संक्रमण H3N2 व्हायरसमुळे झाले असुन त्याला ‘हाँगकाँग फ्लू’ असेही म्हणतात. हा विषाणू देशातील इतर इन्फ्लूएंझा उप-प्रकारांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे.

H3N2 व्हायरस 5 वर्षांखालील लहान मुले,  65 वर्षांपेक्षा जास्त वयाची वृद्ध, गर्भवती महिला, श्वसन आणि दमा रुग्ण, मधुमेह रुग्ण व कर्करोगाच्या रुग्णांसाठी आधिक धोकादायक आहे.

 

 

H3N2 इन्फ्लूएंझाची लक्षणे कोणती?

– श्वासोच्छवासाचा त्रास
– सतत ताप येणे
– छाती किंवा पोटदुखी
– स्नायू दुखणे
– अशक्तपणा आणि चक्कर येणे
– जुन्या आजाराची पुनरावृत्ती
– सर्दी आणि खोकला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.