Hinjawadi : दोन तडीपार गुंडांना अटक; गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यातील दोन तडीपार गुंडांना अटक केली आहे.

नितीन रामभाऊ अवताडे (रा. थेरगाव), विशाल शहाजी कसबे (रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस फौजदार वासुदेव मुंढे यांना माहिती मिळाली की, हिंजवडी पोलिसांनी तडीपार केलेला आरोपी नितीन अवताडे हा वाकड येथील भुजबळ चौकात थांबला आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून नितीन याला अटक केली.

दुस-या कारवाईमध्ये पोलीस शिपाई गोविंद चव्हाण व तुषार काळे यांना माहिती मिळाली की, वाकड पोलिसांनी तडीपार केलेला आरोपी विशाल कसबे हा काळाखडक झोपडपट्टी येथे  आला आहे. पोलिसांनी झोपडपट्टीमधून विशाल याला अटक केली. आरोपींना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. शासनाची कोणतीही परवानगी न घेता ते पुणे जिल्ह्यात आले असल्याने त्यांच्याविरोधात मुंबई पोलीस कायदा कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंढे, आदिनाथ मिसाळ, संजय गवारे, धर्मराज आवटे, नारायण जाधव, शावरसिद्ध पांढरे, धनाजी शिंदे, तुषार काळे, प्रशांत सैद, मोहम्मद नदाफ, सुरेश जायभाये, गोविंद चव्हाण, अजिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.