BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : दोन गुंड तडीपार; देहूरोड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलिसांनी दोन सराईत गुंडांना तडीपार केले आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील सराईतांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू आहे. देहूरोड पोलिसांकडून आणखी 15 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.

अरबाज फारुख शेख (वय 20, रा. आंबेडकर नगर, देहूरोड), हर्षल उर्फ बंटी संभाजी काळोखे (वय 23, रा. देहूगाव), अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज हा देहूरोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दंगल करून वाहनांची तोडफोड करणे, दरोडा टाकणे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण होऊ लागल्याने त्याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहेत. आरोपी हर्षल याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला देखील पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पुढील काळात आणखी 15 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गायकवाड, पोलीस कर्मचारी अनिल जगताप, राजेंद्र कुरणे, नारायण तेलंग, हेमंत गायकवाड यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3