Chinchwad News : मोहननगरमध्ये दोन गटात हाणामारी; वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – मोहननगर परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचवड मधील मोहननगर परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांसोबत हाणामारी करत काही जणांनी परिसरातील वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पिंपरी चिंचवड शहराची नवीन वर्षाची सुरुवात हाणामारी आणि तोडफोडीने झाली आहे. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.