Pune News : तंटामुक्ती समिती समोरच दोन गटात तुफान हाणामारी

एमपीसी न्यूज : शेतीच्या वादातून सुरू असलेला तंटा सोडवण्यासाठी गावात आलेल्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि सदस्य समोरच दोन गटात तुफान हाणामारी झाली. जुन्नर जिल्ह्यातील कोपरे गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सुनील येधु माळी (वय 26) यांनी फिर्याद दिली असून पंधरा ते सोळा जणांविरोधात ओतूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनील माळी आणि आरोपी सोनू माळी यांच्यात शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. आरोपीच्या शेतात असलेल्या एका झाडाची फांदी फिर्यादीच्या शेतात आल्याने फिर्यादीने ची तोडून टाकली होती. यावरून फिर्यादीचे चुलत्यांनी त्याच्या वडिलांना आणि भावांना शिवीगाळ केली होती. त्याची तक्रार कोपरगावच्या तंटामुक्ती समितीकडे केली होती. त्यानुसार तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास बोलावले होते.

दरम्यान मंगळवारी दुपारी तंटामुक्ती समितीसमोर त्यांच्या वादासंदर्भात चर्चा सुरू असताना फिर्यादीने आपण शेत जमिनीचे मोजणी करून घेऊ असे सांगितले. यावेळी आरोपी याने मोजणी करण्यात नकार दिला आणि फिर्यादी सहज त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी पोटात, पाठीवर, कमरेवर बेदम मारहाण केली.

दरम्यान तंटामुक्ती समितीसमोरच अशाप्रकारे दोन गटात तुफान राडा झाल्याने ओतूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.