Chinchwad News : भोसरी, चिंचवडमध्ये सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटना

एमपीसी न्यूज – भोसरी येथे रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि चिंचवड येथे शतपावली करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची मोहन माळ आणि सोनसाखळी चोरून नेल्याच्या घटना रविवारी (दि. 21) घडल्या.

भोसरी येथील घटनेत वैशाली कालिदास बारणे (वय 38, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बारणे रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता त्यांच्या मैत्रिणीसोबत पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 30 हजारांचे 9 ग्रॅम वजनाचे अर्धवट तुटलेले मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

चिंचवड येथील घटनेत शुभांगी नंदकुमार उंडे (वय 59, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी उंडे रविवारी रात्री सव्वाआठ वाजता जुने तालेरा हॉस्पिटल समोर चिंचवड येथे शतपावली करत होत्या. त्यावेळी अनोळखी चोरटा मोपेड दुचाकीवरून आला. त्याने उंडे यांच्या गळ्यातील 75 हजारांची सोन्याची मोहनमाळ आणि 15 हजारांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.