Chinchwad News : एमआयडीसी भोसरी आणि चिंचवड परिसरात पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी आणि चिंचवड परिसरातून दोन नागरिकांचे मोबाईल फोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. हे नागरिक रस्त्याने पायी चालत जात असताना चोरट्यांनी मोबाईल हिसकावले. याबाबत शनिवारी (दि. 11) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संतोष शंकर पवार (वय 48, रा. लांडगे नगर भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ एप्रिल 2021 रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी पवार हे ट्रायटेट कंपनी येथे रस्त्यावर मोबाइल फोनवर बोलत उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.

मिलिंद रामदास दिवाने (वय 33 रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जानेवारी 2021 रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी दीवाने यांच्या आई (वय 55) या शतपावली करीत मोबाइलवर बोलत चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.