Chinchwad : चिंचवडच्या भाजी मंडईतून ज्येष्ठ नागरिकांचे दोन आयफोन चोरीला

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या (Chinchwad) भाजी मंडईमधून 60 वर्षीय आजोबांचे 2 आयफोन चोरीला गेले आहेत. ही चोरी 31ऑगस्ट 2022 रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी (दि.23) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय रमनलाल देवदास (वय 60, रा. निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

DY Patil Hospital : पेशंटचे जागेवर ऑपरेशन करा म्हणत डॉक्टरच्या कानाखाली मारली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजी खरेदीसाठी फिर्यादी गेले असता गणपती उत्सवामुळे मंडईमध्ये गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी फिर्यादी यांच्या खिशातून 95 हजार रुपये किंमतीचे 2 आयफोन चोरले. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.