Pimpri : भाटनगरमधून दोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – भाटनगर पिंपरी येथून दोन किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 31) दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
महावीर येडा गायकवाड (वय 40, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार आतिश कुडके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात गांजा बाळाला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून महावीर गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 55 हजार रुपये किमतीचा दोन किलो वीस ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
https://youtu.be/guYSCjSMRvQ