Chinchwad Crime News : पान टपरीमधून दोन किलो गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूजपिंपरीचिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोहननगर मधील एका टपरीमधून दोन किलो 119 ग्रॅम गांजा जप्त केला. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 9) दुपारी पावणे सहा वाजता मोहननगर येथील जय महाकाल पानटपरी येथे करण्यात आली.

आकाश शिवाजी सरगर (वय 27, रा. दातीर चाळ, चिंचवड), सतीश पांडुरंग डोईफोडे (वय 40, रा. आकुर्डी गावठाण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार बाळासाहेब माधवराव सूर्यवंशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड एमआयडीसी मधील मोहननगर येथे जय महाकाल पान टपरीमधून गांजा विक्री केला जात असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टपरीवर छापा मारून टपरीमधून दोन किलो 119 ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 60 हजार 5 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.