Bhosari : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 10) रात्री पावणेअकराच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौकाजवळ खडी मशीन रोडवर घडला.

_MPC_DIR_MPU_II

प्रतीक बाबाजी पाबळे (वय 23), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश सखाराम पाबळे (वय 41, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अंबादास रावसाहेब तळेकर (वय 39, रा. गव्हाणे वस्ती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयगणेश साम्राज्य चौकाच्या जवळ खडी मशीन रोडवर आरोपी तळेकर याने त्याच्या ताब्यातील बस वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव चालवून प्रतिक पाबळे याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रतिक गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.