BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या ट्रकने मोपेड दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास निघोजे ते स्पाइसर फाट्याकडे जाणाऱ्या रोडवर झाला.
हरीशकुमार के एल, असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी रजनी हरीशकुमार के एल (वय 32, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वाल्मीक कचरू डुबे (रा. मु. पो. पोखरी, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हरीशकुमार हे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास निघोजे ते स्पाइसर फाट्याकडे जाणाऱ्या रोडवरून मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / बी एन 5485) जात होते. ते वोक्स वॅगन कंपनी समोर आले असता आरोपी वाल्मिक याने भरधाव वेगात टेम्पो (एम एच 12 / ई क्यू 2835) चालवून हरीशकुमार यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हरीशकुमार यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement