Kondhwa : दुकान फोडून दोन लाखांची रोकड चोरी

एमपीसी न्यूज – कोंढव्यात एका चिकन सेंटरचे दुकान फोडून दुकानातील रोख दोन लाख 10 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना रविवारी(2) रात्री ते सोमवारी(3) सकाळी आठच्या दरम्यान घडली. याप्रकरणी रिझवान खान (वय 33, आश्रफनगर कोंढवा) यांनी फिर्याद दिली.

रिझवान यांचे कोंढवा आश्रफनगर येथे गरीब नवाज चिकन सेंटर आहे. त्यांचे दुकान कुलूप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने शटर उघडून दुकानातील दोन लाख 10 हजाराची रोकड तसेच कपडे, बँकेचे पासबुक, जमिनीचे मूळ कागदपत्र चोरी करून नेले.

रिझवान यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.