Gahunje : गहुंजे येथून कारमधून दोन लाखांची रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये (Gahunje) पार्क केलेल्या आलिशान कारमधून दोन लाख 10 हजार रुपये रोकड चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी लोढा बेलमेंडो, गहुंजे येथे घडली.

प्रवीणकुमार सुरेंद्रकुमार सिंग (वय 42, रा. लोढा बेलमेंडो, गहुंजे) यांनी याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची मर्सिडीज कार (एमएच 14/जीक्यू 2107) सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्यांनी कारमध्ये दोन लाख 10 हजार रुपये रोख रक्कम ठेवली होती. शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गाडीतून रोकड चोरून नेली. कार वॉश करणारा ऋषी झाडे, कार चालक  (Gahunje) अविनाश डांगी आणि विश्वनाथ कांबळे यांच्यावर फिर्यादींचा संशय आहे. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.

Jansanvad Sabha : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.