Alandi : टेम्पो चालकाकडून कंपनीची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका कंपनीतून दुस-या कंपनीत माल पोहोचवण्यासाठी दोन लाख रुपयांचा माल टेम्पोत भरला. मात्र, हा माल दुस-या कंपनीत न पोहोचवता त्याचा अपहार केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 15) दुपारी साडेचार ते शनिवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान चिंबळी बर्गेवस्ती येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

मुस्तफा जमाल पठाण (रा. बनकरवस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजेश सुभाष वाघ (वय 40, रा. चिंबळी फाटा, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुस्तफा हा फिर्यादी राजेश यांच्या अपर्णा सर्व्हिसेस अँड प्रा. लि. या कंपनीत टेम्पो चालक म्हणून काम करतो. त्याने त्याच्या एम एच 14 / एच जी 0053 या टेम्पोमध्ये चिंबळी बर्गेवस्ती येथील अपर्णा सर्व्हिसेस अँड प्रा. लि. या कंपनीतून शुक्रवारी दुपारी 1 लाख 96 हजार 401 रुपये किमतीचा 30 बीन व दोन बॉक्स बेअरिंग असा माल भरला. हा माल सणसवाडी येथील जॉन डिअर कंपनीत पोहोचवायचा होता. मात्र, हा माल कंपनीत न पोहोचवता त्याचा अपहार करून फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1