Sangavi News : घरबसल्या पैसे कमावणे पडले महागात, पावणे दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  – कपड्याच्या कंपन्यांचे व्हिडीओ लाईक (Sangavi News) करून घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखवून महिलेची 1 लाख 72 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सांगवी परिसरात घडला आहे.

याप्रकरणी शुक्रवारी (दि. 27) लेटिशा, रिया ग्लोबल, ग्लोबल चॅट प्लॅटफॉर्म कंपनी आणि बँक धारक व कंपन्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad News : सकारात्मकता मानवी जीवन सुंदर करते – श्रीकांत चौगुले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला ऑनलाईन माध्यमातून कपड्याच्या मोठमोठ्या कंपन्यांचे व्हिडीओ लाईक केल्यास घरबसल्या पैसे मिळतील असे (Sangavi News) आमिष दाखवले. यातून फिर्यादीकडून 1 लाख 71 हजार 200 रुपये ऑनलाईन माध्यमातून घेत त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.