Pune : पोलीस उपायुक्तांच्या नावाने ठेकेदाराची दोन लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – पोलीस उपायुक्तांचे नाव सांगून ठेकेदाराला एक कोटी रुपये मिळवून देण्याच्या आमिषाने दोन लाखांना लुबाडले. हा प्रकार नोव्हेंबर 2018 पासून 28 जानेवारी 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी प्रसन्न प्रकाश कुलकर्णी (वय 44, रा. चंदननगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सुनील जाधव या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद कुलकर्णी यांचा वॉटर प्रुफिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी एका बांधकाम कंपनीच्या वेगवेगळ्या साईटवर 2017 ते 2018 या काळात काम करून दिले होते. मात्र, त्यांनी त्यांचे बिल त्यांना दिले नाही. वेळोवेळी मागणी करूनही ते एक कोटींचे बिल निघत नव्हते. आरोपीने ही संधी नेमकी हेरून याचा फायदा उचलला. आरोपी जाधव याने माझा पोलीस उपायुक्तांशी वैयक्तिक परिचय असून, तुमचे पैसे मी वसून करून देतो असे सांगून त्यांना दहा लाखांची मागणी केली. मात्र कुलकर्णी यांनी दोन लाखांची मागणी स्वीकारून त्यांना ते पैसे दिले.

मात्र, दोन लाख रुपये देऊनही जाधव यांना आपले एक कोटीचे बिल न मिळाल्याने अखेरीस त्यांनी स्वतःच पोलीस उपायुक्त गायकवाड यांची भेट घेतली. त्यांनी गायकवाड यांना घडलेली घटना सांगितली. त्यावेळी गायकवाड यांनी रितसर तक्रार देण्याचे सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार हडपस पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.