Hinjawadi : जबरदस्तीने कार पळविणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कार चालकाला मारहाण करून जबरदस्तीने कार पळवून नेणा-या दोन चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. दोन दिवसात या गुन्ह्याचा तपास लावण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे.

ऋतिक पाटील गायकवाड (वय 20, रा. दत्त मंदिराच्या मागे, जांबे, ता. मुळशी), मोहन शांताराम जाधव (वय 20, रा. तुकाई मंदिराशेजारी, शिंदेवस्ती नेरेगांव, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तम्मा पांडुरंग बुरंगे (वय 23, रा. ऊरळी देवाची, ता . हवेली) यांना दोघांनी पुनावळे मधील भारत पेट्रोल पंपाजवळ अडवले. जबरदस्तीने त्यांच्या कारची (एम एच 12 / क्यु डब्ल्यु 4831) चावी घेऊन दोघांनी कार पळवून नेली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी चोरलेल्या कारसह इंदिरा कॉलेज जवळ फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक आतिक शेख यांना मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. ऋतिक याने सांगितले की, पुनावळे येथे त्याने व त्याचा मित्र महेश याने मिळून हा गुन्हा केला आहे. यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख अधिकारी अनिरुद्ध गिझे, एम. डी. वरुडे, वायबसे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हणमंत कुंभार, सुभाष गुरुव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडु, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.