BNR-HDR-TOP-Mobile

Maval : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.

अनिस चांदभाई शेख (वय 29, रा. केशवनगर, वडगाव ता. मावळ), राम दशरथ माने, (वय 32, रा. कामशेत, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार,  दहीहंडी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वडगाव मावळ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोघेजण कान्हे फाटा येथे संशयितरित्या थांबले असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुपारी अडीचच्या सुमारास कान्हेफाटा येथे सापळा रचून अनिस आणि राम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी एकूण 50 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींना पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलिसांकडे देण्यात आले आहे.

.