Chikhali Crime News : पादचारी महिलेचे 95 हजारांचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – नातेवाईकांच्या घरून आपल्या घरी परतत असलेल्या महिलेच्या गळ्यातील 95 हजार रुपये किमतीचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री पाटीलनगर कॉर्नर, आळंदी देहू रोड, चिखली येथे घडली.

शीतल राम गिरवलकर (वय 36, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शीतल त्यांच्या पाहुण्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर त्या त्यांच्या घरी पायी चालत जात होत्या. पाटीलनगर कॉर्नर येथे आल्यानंतर एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी शितल यांच्या गळ्यातील 95 हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.