Alandi : उघड्या दरवाजावाटे दोन मोबाईल फोन चोरले

एमपीसी न्यूज – गरम होत असल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दोन मोबाईल फोन पळवले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी मरकळ येथे घडली.

सुरेंद्र कुमार शिवपूजन महतो (वय 38, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कुमार खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी सकाळी सात वाजता ते कामावरून घरी आले. त्यानंतर घरात गरम होत असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेऊन ते झोपी गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. घरातून 10 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. सकाळी दहाच्या सुमारास सुरेंद्र झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.