Mobile Thieves Arrested : लॉकडाऊन काळात मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक, 24 मोबाईल हस्तगत

Two mobile thieves arrested during lockdown, 24 mobiles seized दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटे मैदानात हे चोरटे थांबले होते. गस्तीवर असणार्‍या पोलिसांना यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या

एमपीसी न्यूज – दत्तवाडी पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात चोरी केलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे 24 मोबाईल हस्तगत केले. या मोबाईलची किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे. अमर वैजनाथ समुखराव (वय 20) आणि प्रवीण उर्फ अनिल नामदेव मिटकर (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटे मैदानात हे चोरटे थांबले होते. यावेळी गस्तीवर असणार्‍या पोलिसांना यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांच्याजवळ गाडीची आणि मोबाईलची कागदपत्रे मागितली असता यावर ते समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरल्याचे कबूल केले.

त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत लॉकडाउनच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपन्यांची 24 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. हे सर्व मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like