Hinjawadi : हिंजवडी, वाकडमध्ये विनयभंगाच्या दोन घटना

एमपीसी न्यूज – हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन विनयभंगाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

वाकड येथे आमच्याबरोबर संबंध ठेव असे म्हणत दोघांनी एका तरुणीला पकडून पुलाखाली फेकून देण्याची धमकी दिली. तसेच तिचा मोबाईलही फोडून टाकला. याप्रकरणी 20 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश वसंत गायकवाड व श्याम गणेश राठोड (रा. बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी येथील घटनेप्रकरणी 53 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7875235946 व 9632711286 या मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांच्या परिसरातील महिलांना  7875235946 व 9632711286 या मोबाईल फोन वापरणा-या आरोपींनी त्यांना फोन करून अश्लील बोलून विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.