Pimpri Crime News : बोगस ‘एफडीआर’ प्रकरणी आणखी दोन गुन्हे दाखल, एकास अटक   

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवेदांसाठी बनावट एफडीआर सादर केलेल्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी एक जणाला अटक करण्यात आली आहे. 

बी. के. कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग कंपनीचे मालक परमेश्वर हनुमंत क्यातनकेरी (वय, 50) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच राधिका कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक अटल प्रितमदास बुधवानी (वय, 61) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे लेखा अधिकारी रमेश कुमार विठ्ठलराव जोशी (वय 58, रा. वारजे) यांनी शुक्रवारी (दि.5) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामधून स्थापत्य विषक कामाच्या निविदा निघतात. त्यामध्ये लघुत्तम दराने निविदा घेणा-या ठेकेदाराला अटी व शर्तीनुसार सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने निविदा दिल्या जातात. सदर निविदेच्या अनुषंगाने एफडीआर व बॅक गॅरंटी घेतली जाते. बी.के.कन्ट्रक्शन ॲण्ड इंजिअरींअचे मालक परमेश्वर हनुमंत क्यातनकेरी यांनी 26 जून 2019 ते 10 जुलै 2020 या कालावधीत पालिकेच्या स्थापत्य विषयक दोन कामे घेतली होती. त्यांनी टीजे एसबी बँकेची बँक गॅरंटी पालिकेला सादर केली होती. हि बँक गॅरंटी बनावट असल्याचे समोर आले आहे.

तसेच, राधिका कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक अटल प्रितमदास बुधवानी यांनी 20 डिसेंबर 2019 ते 13 फेब्रुवारी 2020 पालिकेच्या स्थापत्य विषयक तीन कामे घेतली होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र बँकेची बँक गॅरंटी पालिकेला सादर केली होती. हि बँक गॅरंटी बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.