Dighi Crime News : धक्कादायक! लॉजमध्ये आढळले जोडप्याचे नग्नावस्थेत मृतदेह

एमपीसी न्यूज – दिघी परिसरातील मॅगझीन चौकात असलेल्या एका लॉजमध्ये एका जोडप्याचे मृतदेह नग्नावस्थेत आढळून आले आहेत. हा प्रकार गुरुवारी (दि. 25) सकाळी उघडकीस आला असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अजंठानगर झोपडपट्टी येथे राहणारा 28 वर्षीय तरुण, तर त्याच परिसरात राहणारी 35 वर्षीय महिला असे दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे आणि महिलेचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्या विरोधात काही गुन्हे दाखल आहेत, तसेच महिलेच्या पतीच्या विरोधात देखील गुन्हे दाखल असून त्यात त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या महिलेचा पती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

बुधवारी दुपारी तरुण आणि महिला मॅगझीन चौकातील एका लॉजमध्ये आले. त्यांनी येताना कॅरीबॅगमधून पार्सल जेवण आणले होते. रात्री ते लॉजमधील खोलीच्या बाहेर आले नाहीत. सकाळी देखील बराच वेळ झाला तरी ते बाहेर येत नसल्याने लॉजमधील कामगाराने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दरवाजा उघडला असता दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळून आले.

दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. उत्तरीय तपासणीत मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दिघी पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.