IPL New Team : आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश, ‘यांनी’ खरेदी केले संघ

एमपीसी न्यूज – इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दोन नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षीच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन संघ सामील होणार आहेत. संजीव गोयंकाचा ‘आरपीएसजी समूह’ लखनऊ तर ‘सीव्हीसी कॅपिटल’ अहमदाबाद संघांचा मालक झाला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज सोमवारी दुबईमध्ये टीम बिडिंग प्रक्रियेनंतर या संघांची घोषणा झाली. आरपीएसजी समूहाने 7,090 कोटींची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली. सीव्हीसी कॅपिटलने 5,600 कोटी रुपयांची बोली लावली.

पुढील हंगामापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये या दोन संघासाठी मेगा लिलाव होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.