_MPC_DIR_MPU_III

Lonavala : मळवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या धडकेत दोन जण ठार

एमपीसी न्यूज : लोणावळा पुणे लोहमार्गावरील मळवली रेल्वे स्थानकासमोरील रेल्वे फाटक ओलांडताना पुणे इंदौर एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने दोन स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला. यापैकी एक जण अल्पवयीन आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II
सतिश शिवराम हुलावळे (वय 32, रा. कार्ला, ता. मावळ) व महेंद्र जसाराम चौधरी (वय13, रा. मळवली, ता. मावळ) या दोघांचा या अपघातात दुदैवी मृत्यू झाला. मळवली रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबली होती. या मालगाडीच्या आडून रेल्वे मार्ग ओलांडत असताना पुणे इंदौर या एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने हुलावळे व चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी रेल्वे फाटक बंद असताना मार्ग ओलांडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.